महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला!

पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २१ ऑगस्टला सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. २२ ऑक्टोबरला त्यांना सीबीआय प्रकरणी जामीन मिळाला होता. मात्र, 'ईडी'ने अटक केल्यामुळे ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.

Delhi HC again denies bail to Chidambaram in INX Media money laundering case

By

Published : Nov 15, 2019, 5:02 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला आहे. १३ नोव्हेंबरला दिल्लीतील रोझ अ‌ॅव्हेन्यू न्यायालयाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती.

८ नोव्हेंबरला, चिदंबरम आणि 'ईडी'ची बाजू ऐकून घेतल्यानंतर, चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायाधीश सुरेश कैत यांनी राखून ठेवला होता. ‌चिदंबरम यांना १६ ऑक्टोबरला 'ईडी'कडून अटक करण्यात आली होती.

पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २१ ऑगस्टला 'सीबीआय'कडून अटक करण्यात आली होती. २२ ऑक्टोबरला त्यांना सीबीआय प्रकरणी जामीन मिळाला होता. मात्र, 'ईडी'ने अटक केल्यामुळे ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा :आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details