नवी दिल्ली :समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना दिल्लीच्या रोज अव्हेन्यू न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऑपरेशन वेस्ट एंड नावाच्या एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासमवेत इतर आरोपींनाही प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२००० साली तहलका डॉट कॉम नावाच्या एका पोर्टलने स्टिंग ऑपरेशन करत भ्रष्टाचार उघड केला होता. ऑपरेशन वेस्ट एंड असे या ऑपरेशनचे नाव होते. यासंदर्भात सीबीआयने २००६ला चार्जशीट दाखल केली होती. तर, २०१२ला न्यायालयाने या प्रकरणातील तीन आरोपींवर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते.