अजमेर - सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्यावर ८०८ वा वार्षिक उरूस उत्सव सुरू आहे. उरुसानिमित्त दर्गाह परिसरातील कमानींना रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यावर ८०८ वा वार्षिक उरूस उत्सव सुरु विश्व विख्यात सुफींच्या चिश्ती या संप्रदायाचे भारतातील संस्थापक सुफींच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी हे मूळचे पर्शिया म्हणजेच इराणचे आहेत. त्यांनी राजस्थानधील अजमेर येथे राहून कार्य केले. त्यांच्या अजमेर येथील गरीब नवाज दग्र्यापुढे लोक अद्यापही नतमस्तक होतात. या दर्ग्याला अनेक नेते भेट देतात आणि चादर चढवतात. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने चादर चढवण्यात आली आहे.
ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्यावर ८०८ वा वार्षिक उरूस उत्सव सुरु भारतीय उपखंडात सुफी संतांचा मोठा वारसा आहे. यातून भारत हे बंधुता आणि प्रेमाचे केंद्र बनले. सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे. सूफी पंथात अनेक संप्रदाय असले तरी भारतीय उपखंडात प्रमुख चार संप्रदाय प्रचलित होते. त्यापैकी चिश्ती संप्रदाय, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी भारतामध्ये आणला.
सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांचा दर्गा हेही वाचा -शरद पवारांकडून अजमेरच्या ‘ख्वाजा गरीब नवाज’ यांच्या दर्ग्याला चादर