नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून अनेत कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यात गुंतल्या आहेत. भारतीय औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसीवर ही परवानगी देण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी डीसीजीआयची परवानगी
भारतीय औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे.
भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करणार आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लसीचे नाव आहे. सिरमने पाठवलेल्या प्रोटोकॉलचे तज्ज्ञांच्या समितीने मूल्यमापन केले. कोविशिल्ड लसीची फेज दोन आणि तीनची मानवी चाचणी करण्यासाठी सिरमने 25 जुलै रोजी डीसीजीआयकडे परवानगी मागणारा अर्ज केला होता.
दरम्यान, यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत ऑक्सफर्डची ही लस चाचणीच्या निर्णयाक टप्प्यावर आहे. ऑक्सफर्डच्या या लसीनं आतापर्यंत चांगली प्रगती केली असून भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. जगभरात अनेक लसी विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकी एक आहे.