महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरात पोलिसांचा अजब कारभार; पीडित महिलेवरच गुन्हा दाखल

गुजरातच्या बनसकांठा जिल्ह्यात एका दलित महिलेची छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात आरोपींवर कारवाई न करता, पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गुजरात
गुजरात

By

Published : Oct 11, 2020, 2:47 PM IST

नवी दिल्ली - गुजरातमधील बनसकांठा जिल्ह्यातील देवदार तालुक्यातील खेड्यात दलित महिलेची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावर पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वडगामचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटद्वारे या प्रकरणाची माहिती दिली.

पटेल समाजातील 6 जणांनी मुलीचा विनयभंग केला आणि जेव्हा कुटुंबीयांनी त्यांचा विरोध केला. तेव्हा सुमारे 25 जणांनी त्यांना मारहाण केली. तर, आरोपींवर कारवाई न करता, गुजरात पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबातील 5 सदस्यांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला.

हाथरसमधील पीडितेची पोलिसांकडून बदनामी करण्यात येत आहे. त्याचप्रकारे गुजरातमध्ये पीडित महिलेलाच मारहाण करून तिच्याचविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुजरातमध्ये हे काय सुरू आहे, असा सवाल जिग्नेश मेवाणी यांनी गुजरात पोलीस महासंचालक केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि गुजरात पोलीस महासंचालक यांच्यासह अनेकांना त्यांनी हे टि्वट टॅग केले आहे. एससी - एसटीविरुद्ध खोटा एफआयआर नोंदवणे एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा आहे हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details