महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुन्हे शाखेकडून तबलिगी जमातीच्या 800 परदेशी सदस्यांना नोटिसा

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 800हून अधिक परदेशी तबलिगी जमातीच्या सदस्यांना नोटिसा बजवाल्या आहेत. यात पर्यटक व्हिसावर आले असताना त्यांनी भारतात येऊन धार्मिक प्रचार केल्याचा आरोप आहे.

By

Published : May 24, 2020, 12:46 PM IST

दिल्ली निजामुद्दीन
दिल्ली निजामुद्दीन

नवी दिल्ली - दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज प्रकरणाचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 800हून अधिक परदेशी तबलिगी जमातीच्या सदस्यांना नोटिसा बजवाल्या आहेत. यात पर्यटक व्हिसावर आले असताना त्यांनी भारतात येऊन धार्मिक प्रचार केल्याचा आरोप आहे. त्यांचे पासपोर्ट यापूर्वीच जप्त करण्यात आले असून गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.

मरकज येथून 2 हजार 300 लोकांना बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये जवळपास 1 हजार परदेशी नागरिकांचा समावेश होता. या सर्वांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. गुन्हे शाखेने आतापर्यंत 800 सदस्यांना नोटीस पाठवून चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. हे सदस्य इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि सौदी अरेबियातील आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details