हैदराबाद - जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना विषाणूवर विजय मिळवण्याच्या दिशेने भारताने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने शनिवारी देशातील जवळपास तीन कोटी आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्याची घोषणा केली.
कोव्हिशिल्डचे 1.1 कोटी आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस
हैदराबादस्थित भारत बायोटेकने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्डचे 1.1 कोटी आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस उपलब्ध करून देण्याचे केंद्राने आदेश दिले आहेत.
प्रति डोस किती रु.?
कोव्हिशिल्डची किंमत प्रति डोस २०० रुपये आहे. ३८.५ लाख डोसेससाठी २९५ रुपये प्रतिडोस आकारण्याची भारत बायोटेकची योजना आहे. तर उर्वरित १६.५ लाख डोसेस विनामूल्य दिले जाणार आहेत. दुसरीकडे, कोव्हॅक्सिनचा डोस २०६ रुपयांना उपलब्ध आहे.
कोणत्या राज्यांना किती?
राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी कोव्हॅक्सिनच्या वापरास परवानगी दिली आहे. यापैकी दहा राज्यांना यापूर्वीच कोव्हॅक्सिनचे २०,००० डोस मिळाले आहेत, तर आसामला आतापर्यंत १२, ००० डोस मिळाले आहेत.
काही राज्यांकडून लस मोफत
दिल्ली, आंध्र, तेलंगाणा, पंजाब कोव्हिशिल्ड वापरतील. सरकारच्या म्हणण्यानुसार, विविध मापदंड, चाचण्यांनंतर यास परवानगी मिळाली आहे. तामिळनाडू, केरळ, बिहार, पश्चिम बंगाल यासारख्या काही राज्यांनी सर्वांसाठी मोफत लस जाहीर केली आहे.