महाराष्ट्र

maharashtra

कोरोना विषाणू : देशात आढळले तीन नवीन रुग्ण..

नवी दिल्ली, राजस्थान आणि तेलंगाणामध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या तिघांनाही सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

By

Published : Mar 2, 2020, 3:50 PM IST

Published : Mar 2, 2020, 3:50 PM IST

Updated : Mar 2, 2020, 8:04 PM IST

COVID-19: Two more positive cases reported
कोरोना विषाणू : देशात आढळले दोन नवीन रूग्ण..

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन नवे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्ली, राजस्थान आणि तेलंगाणामध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या तिघांनाही सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

यांपैकी दिल्लीतील रूग्ण हा इटलीहून भारतात परतला होता, तर तेलंगाणामधील रूग्ण दुबईहून भारतात परतला होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की सध्याची परिस्थिती पाहता, चीन आणि इराकमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. परिस्थिती आणखी बिघडल्यास हीच बंदी इतर देशांनाही लागू करण्यात येऊ शकते, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अगदीच आवश्यक असल्याशिवाय चीन, इराण, कोरिया, इटली आणि सिंगापूर या देशांमध्ये जाऊ नये, असे आवाहनही लोकांना केले आहे.

तसेच राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये आढळलेला रूग्ण हा इटलीवरून आला होता. विमानतळावर झालेल्या तपासणीमध्ये त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, दुसऱ्या एका तपासणीमध्ये त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला सध्या विशेष कक्षामध्ये ठेवले गेले असून, २९ फेब्रुवारीपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी सुरू आहे. तसेच त्याच्या रक्ताचे नमुने हे पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

देशात यापूर्वी केरळमध्येही कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते, मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

Last Updated : Mar 2, 2020, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details