महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ ; 28 हजार 637 जणांना संसर्ग

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाख 49 हजार 553 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 34 हजार 621 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Jul 12, 2020, 1:27 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत असून गेल्या 24 तासांत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 28 हजार 637 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 551 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाखाच्याही पुढे गेला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाख 49 हजार 553 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 34 हजार 621 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 116 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 46 हजार 600 वर गेली आहे. यातील एकूण 99 हजार 499 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 36 हजार 985 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 10 हजार 921 वर पोहचली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वांत जास्त मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 334 जणांचा बळी गेला आहे. तर 19 हजार 895 रुग्णांवर उपचार सुरू असून 87 हजार 692 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान गुजरात राज्यात 40 हजार 941 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 34 हजार 226 कोरोनाबाधित तर 1 हजार 898 जणांचा बळी गेला आहे.

कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details