हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात रविवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4,10,461 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 13,254 झाला आहे. तर आतापर्यंत 2,27,755 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई
राज्यभरात कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. त्यातच रविवारी ३८७० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १५९१ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत.
उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू- ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अमरावती १, बुलडाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.
ओडिशा
ओडिशामध्ये रविवारी 304 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतच एका दिवसातील रुग्ण वाढीचा हा उच्चतम आकडा आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 5,160 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासात 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2,24,402 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.