महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2020, 10:38 AM IST

ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार नव्या रुग्णांची नोंद; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ लाखांवर..

काल दिवसभरात एकूण 1,179 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 97 हजार 497 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 62 लाख 25 हजार 764 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 40 हजार 441 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

COVID-19 live: With spike of 80,472 cases, India's COVID-19 tally reaches 62,25,763
गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार नव्या रुग्णांची नोंद; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ लाखांवर..

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 80 हजार 472 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 62 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

काल दिवसभरात पार पडल्या 10 लाख 86 हजार 688 कोरोना चाचण्या

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,179 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 97 हजार 497 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 62 लाख 25 हजार 764 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 40 हजार 441 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 51 लाख 87 हजार 826 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 86 हजार 688 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 41 लाख, 96 हजार 729 एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details