आगरतला - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 24 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. 6 दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 86 वर पोहचला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दिली.
त्रिपुरामध्ये बीएसफच्या आणखी 24 जवानांना कोरोनाची लागण...
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 24 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. 6 दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 86 वर पोहचला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दिली.
बटालियन 86 मधील जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवानांचे कुटुंब आणि मेसमधील कर्मचारी असून 1 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. सर्व कोरोनाबाधितांवर शहरातील गोविंद बल्लभ पंत वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बटालियन 138 आणि बटालियन 86 मधील तब्बल 680 जवानांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी घेण्यात येत आहे. बटालियन मुख्यालय, गंडाचेरा येथील एक बेस कॅम्प आणि करीना येथे बांगलादेशला लागून असलेली सीमा चौकी अशी तीन ठिकाणे कन्टेंन्मेट झोन म्हणून घोषीत केली आहेत.