महाराष्ट्र

maharashtra

देशात 56 हजार 383 जण कोरोनामुक्त; दिवसभरात 942 जणांचा मृत्यू

By

Published : Aug 14, 2020, 4:45 AM IST

गुरुवारी सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 56 हजार 383 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची देशभरातील संख्या 17 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात 16 लाख 95 हजार 982 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

india corona update
भारत कोरोना अपडेट

हैदराबाद- भारतात गुरुवारी सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 56 हजार 383 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची देशभरातील संख्या 17 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात 16 लाख 95 हजार 982 जण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतातील कोरोना मृत्यूदर देखील कमी झाला असून तो 1.96 टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

गुरुवारपर्यंत भारतात 6 लाख 53 हजार 622 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 47 हजार 33 वर पोहोचली आहे. त्यापैकी 942 जणांचा मृत्यू गुरुवारी झाला. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबातीत तिसऱ्या क्रमांकावर असणारा भारत देश कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. भारताअगोदर अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोचा समावेश आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

महाराष्ट्र

मुंबई-राज्यात गुरुवारी 9115 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होणाचे प्रमाण 69.8 टक्के एवढे आहे. दिवसभरात 11 हजार 813 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या 1 लाख 49 हजार 798 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बिहार

पाटणा-गुरुवारी बिहार राज्यात एकूण 3 हजार 906 कोरोना रुग्ण आढळून आले. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 94 हजार 459 वर पोहोचली आहे. 62 हजार 507 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बिहारचा कोरोनामुक्तीचा दर 68.17 एवढा झाला आहे. दरम्यान, एका दिवसात 1 लाख 4 हजार 452 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 13 लाख 77 हजार पेक्षा जास्त लोकांची कोरोना तपासणी बिहार राज्यात करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश

शिमला- मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या ताफ्यातील दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहीत आहे. दोघांमधील एक जण मुख्यमंत्र्याच्या वाहनाचा चालक आहे. तर सुरक्षा दलात कार्यरत आहे. 7 ऑगस्टला मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सोबत कांग्रा ते ज्वालामुखी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनातून प्रवास केला आहे.मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा उना दौरा रद्द झाल्याने ते दोघेही शिमला येथे कामावर हजर झाले होते. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 3681 वर पोहोचली आहे. तर 2362 एवढे नागिरक कोरोनामुक्त झाले आहेत तर 1275 जण कोरोनावर उपचार घेत आङेत.

उत्तराखंड

डेहराडून- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या परिस्थितीत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये म्हणून उत्तराखंड सकारच्या मंत्रिमंडळाने विधानसभेतील लोकप्रतिनिधींनी एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत दान करण्याचा निर्णय अध्यादेश काढून घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता झुबिन नौतियालचे वडिल व जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष रामेशरण नौतियाल यांच्या टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

झारखंड

रांची-भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षण शिबीरात महेंद्रसिंह धोनी 14 ऑगस्टला सहभागी होणार आहे. 13 वे आयपीएल संयुक्त अरब अमिरात येथे होत आहे. गुरुनानक हॉस्पिटल आणि संशोधन संस्थ्या येथील प्रतिनिधींनी धोनीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.

राजस्थान

जयपूर- राजस्थानातील सत्ता संघर्ष संपण्याची परिस्थिती असताना बुंदी जिल्ह्यात 17 नवीन कोरोनाबाधित रुग्ण राज्यात वाढले आहेत. 17 जणांमध्ये 3 पोलीस आणि 14 राजस्थानातील बुंदी जिल्हा येथील सर्वजण आहेत. प्रशासनाकडून रुग्ण सापडलेला परिसर सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतूक करण्यात आला. राज्यात एकूण 608 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 56 हजार 708 वर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details