महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अटल'नंतर आता भारताला मिळणार 'जोझिला', आजपासून बोगदा निर्मितीचे काम सुरू

लेहला काश्मीरशी जोडण्यासाठी जोझिला बोगदा निर्मितीचे कामही सुरू करण्यात आले आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट केला.

जोझिला
जोझिला

By

Published : Oct 15, 2020, 4:12 PM IST

Updated : Oct 15, 2020, 7:33 PM IST

नवी दिल्ली -काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणाऱ्या 'अटल बोगद्या'चे लोकार्पण केले होते. त्यानंतर आता लेहला काश्मीरशी जोडण्यासाठी जोझिला बोगदा निर्मितीचे कामही सुरू करण्यात आले आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट केला. हा बोगदा श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय राजमार्गावर 11,578 फूट उंच आणि 14.15 लांब आहे. जोझिला खिंडीला पोखरून हा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी

सध्या चीन आणि भारतादरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच जोझिला बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जोझिला बोगदा सैन्यासाठी म्हत्त्वपूर्ण आहे. यामुळे प्रवासाचा वेग कमी होणार असून, तो सुरक्षीतही असणार आहे. सध्या या भागात सहा महिनेच वाहतूक सुरु असते. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ता बंद असतो. या बोगद्यामुळे ही समस्या दूर होणार असून सैन्याची वाहतूक जलद आणि सोपी होणार आहे.

आजपासून जोझिला बोगदा निर्मितीचे काम सुरू

जोझिला बोगदा प्रकल्प 2013 मध्ये यूपीएच्या काळात मंजूर झाला होता. हा बोगदा 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बोगद्याच्या बांधकामाचा खर्च सुमारे 6808.63 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी 6 वर्षांचा वेळ लागणार आहे.

Last Updated : Oct 15, 2020, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details