महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणात काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

विकास चौधरी गाडीतून उतरताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार सुरूकेला. यात विकास यांना ८ ते १० गोळ्या लागल्या होत्या.

By

Published : Jun 27, 2019, 12:15 PM IST

काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरी

फरीदाबाद -हरियाणातील फरीदाबाद येथे गुरुवारी सकाळी काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरी यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले.

विकास चौधरी नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सेक्टर-९ मधील हुडा मार्केट येथील पीएचसी जिमकडे निघाले होते. विकास चौधरी गाडीतून उतरताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार चालू केला. विकास यांना जवळपास ८ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या. विकास यांच्या गळ्यावर आणि छातीवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विकास यांना पृथला गावातील सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून विकास यांना मृत घोषित केले. विकास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस आयुक्त जयवीर राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. विकास यांच्या गळ्यावर गोळी लागल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details