नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. या निर्णयानंतर काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी भाजपवर टीका केली आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकार करत असणाऱ्या उपययोजनांवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संकटकाळात भाजप एकाधिकारशाही निर्माण करत असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी केले आहे.
'संकटकाळात भाजप एकाधिकारशाही निर्माण करतेय'
कोरोनाच्या काळात केंद्र सरकार करत असणाऱ्या उपययोजनांवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संकटकाळात भाजप एकाधिकारशाही निर्माण करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये अनेकांसमोर उपजीविकोेचा प्रश्न उभा राहीला आहे. कोरोनाच्या लढाईत आम्ही जोपर्यंत जास्तीत जास्त चाचण्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट्स यांचा पुरवठा करत नाही तोपर्यंत ही लढाई जिंकू शकत नसल्याचे मत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये काही बदल करावे, त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे मार्गदर्शन घ्यावे, असेही देव म्हणाल्या,
अहमदाबादच्या कॅडीला हेल्थ केअर कंपनीला कोरोनासाठी चाचणी कीट तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सरकारच्या निर्णयावर देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने फक्त त्याच कंपनीला परवानगी का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपने मक्तेदारी तयार केली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आता सर्व कंपन्यांना परवानगी देण्याची गरज असल्याचे देव यांनी म्हटले आहे.