महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढल्यामुळे काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन

गांधी कुटुंबीयांची विशेष सुरक्षा व्यवस्था (एसपीजी सुरक्षा) रद्द केल्याच्या निर्णयावर दिल्लीमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली.

By

Published : Nov 8, 2019, 7:13 PM IST

काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करताना

नवी दिल्ली - गांधी कुटुंबीयांची विशेष सुरक्षा व्यवस्था (एसपीजी सुरक्षा) रद्द केल्याच्या निर्णयावर दिल्लीमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास स्थानाबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना विशेष सुरक्षा पुन्हा लागू करण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचाही समावेश होता. मात्र, त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर त्याजागी सीआरपीएफ जवानांद्वारे दिली जाणारी, झेडप्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात येतो. एखाद्या व्यक्तीच्या जिवाला धोका आहे किंवा नाही, याचा आढावा सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात येतो, त्यानंतरच हा निर्णय घेतला जातो. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून त्याजागी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details