महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र सत्ता पेच : काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; दोन-तीन दिवसात होणार अंतिम निर्णय

महाराष्ट्रातील राजकारणात पुढील वाटचाल ठरवण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील १० जनपथ येथील सोनिया गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला ए. के. अँटोनी, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकीला उपस्थित होते.

By

Published : Nov 19, 2019, 3:43 PM IST

Congress-NCP leaders to meet in Delhi in a day or two to give final shape to the Common Minimum Program of both the parties

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील राजकारणात पुढील वाटचाल ठरवण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील १० जनपथ येथील सोनिया गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. ए. के. अँटोनी, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकीला उपस्थित होते.

आम्ही लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतही एक बैठक घेणार आहोत. त्यामध्ये काही मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

तर, कॉमन मिनिमम प्रोग्राम (सीपीएम) बाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करणार असल्याची माहिती के. सी. वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांनी दिली. याबाबत अजून कोणताही मसूदा तयार करण्यात आला नाही. पुढील बैठकीमध्ये त्यावर चर्चा करून मसूदा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :काँग्रेस नेते व्यस्त असल्याने आघाडीची आजची बैठक रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details