नवी दिल्ली -स्टार प्रचारकांच्या यादीचे सर्वाधिकार राजकीय पक्षांनाच असतात, केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगानेच मार्गदर्शिकेचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही सिंह यांनी यावेळी केला. काँग्रेसचे स्टार प्रचारक कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कमलनाथ यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा 'स्टार' प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी आचारसंहितेचे सतत उल्लंघन केल्याचे म्हणत आयोगाने ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण?