चंदीगड- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एका कार्यकर्त्याला सेल्फी घेत असताना चांगलेच फटकारले. एका कार्यक्रमात खट्टर फुले उधळत असताना हा कार्यकर्ता मोबाईल घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा खट्टर यांनी त्यांच्या हातावर जोरदार फटका मारून त्याला दूर केले.
मनोहरलाल खट्टरांना सेल्फी खटकला; कार्यकर्त्याला फटकारून ढकललं बाजूला
सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता खट्टर यांच्या झिडकारण्याने भांबावून गेला. त्याचा चेहरा चागंलाच पडला होता. त्याने तत्काळ तेथून काढता पाय घेतला.
हरियाणातील करनाल जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थितांवर हाताने फुले उधळत होते. याचवेळी एक कार्यकर्ता त्यांच्यासमोर येऊन मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा संतापलेल्या खट्टर यांनी त्याच्या हातवार जोरदार फटका मारत त्याला बाजूला केले. माध्यमांच्या कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे.
सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता खट्टर यांच्या झिडकारण्याने भांबावून गेला. त्याचा चेहरा चागंलाच पडला होता. त्याने तत्काळ तेथून काढता पाय घेतला. कॅमेऱ्यासमोर कोणी आल्यास मोदी स्वत: हाताने त्या व्यक्तीला बाजूला करत असल्याचे व्हिडिओ यापूर्वी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मोदींना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र, आता मनोहरलाल खट्टर यांनीही तोच कित्ती गिरवल्याचे बोलले जात आहे. त्यांनीही मधे येणाऱ्या कर्यकर्त्याला चांगलेच फटकारत दूर ढकलले.