महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा कहर... कर्नाटकमधील कंडक्टर आता  'पीपीई'मध्ये

कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी खासगी बसमालकांनी पीपीई किट कंडक्टरांना दिले आहेत. शहरातील स्टेट बँक-शक्तीनगर मार्गावर चालणाऱ्या बसचा कंडक्टर 'पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट' (पीपीई) या संरक्षक पोशाखामध्ये पाहायला मिळाला.

पीपीई किट
पीपीई किट

By

Published : Jun 6, 2020, 2:36 PM IST

बंगळुरू - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये खासगी बससेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी बस कंडक्टर कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट' (पीपीई) किट घालत आहेत.

कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी खासगी बसमालकांनी पीपीई किट कंडक्टरांना दिले आहेत. शहरातील स्टेट बँक-शक्तीनगर मार्गावर चालणाऱ्या बसचा कंडक्टर 'पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट' (पीपीई) किटमध्ये पाहायला मिळाला.

"पीपीई किट्स घालण्यापूर्वी आम्ही बसमध्ये काम करण्यास घाबरलो होतो. कारण, तिकीट काढण्यासाठी प्रत्येक प्रवाशासोबत संवाद साधावा लागतो. मात्र, आमच्या मालकाने आम्हाला पीपीई किट्स दिले. त्यामुळे आता आम्हाला सुरक्षीत असल्याचे वाटत आहे, असे बस कंडक्टर सईशा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details