चेन्नई-अण्णा अंतराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीकडून 300 ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची १५ लाख रुपये आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या किंमतीप्रमाणे तस्करीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
चेन्नई विमातळावरुन ३०० ग्रॅम सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई
सौदी अरेबियावरुन चेन्नईच्या अण्णा अंतराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विशेष विमानात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
फळांच्या पेट्यांमधून सोन्याची तस्करी
सौदी अरेबियावरुन चेन्नईच्या अण्णा अंतराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विशेष विमानात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी विमानातील प्रवाश्यांची तपासणी केली असता एका प्रवाश्याचे सामान संशयास्पद आढळून आले. अधिकाऱ्यांनी त्या सामानाची झाडाझडती घेतली असता फळांच्या पेट्यांमध्ये लपलेले 300 ग्रॅम सोने आढळून आले. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सोने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.