नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आत्यवश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. चंदीगढमधील एका परिचारीकेने कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यामुळे आपले लग्न पुढे ढकलले आहे.
रुचिका चौधरी असे परिचारिकेचे नाव आहे. रुचिका ह्या चंदीगढमधील सरकारी रुग्णालयात कार्य करतात. सध्या त्या आयसोलेशन कक्षातील कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. त्यांचे लग्न रुचिकाने देशसेवेला प्राधान्य देत लग्न पुढे ढकलेले आहे.
कडक सॅल्युट ! लग्न पुढे ढकलून परिचारिकेचे कर्तव्याला प्राधान्य प्रत्येक मुलीच्या जीवनात लग्नाला अतिशय महत्त्व आहे. मात्र, लग्न कधीही केले जाऊ शकतं. यावेळी देशाला माझ्या योगदानाची गरज आहे. मी कोरोना रूग्णांमध्ये काम करत आहे. त्यामुळे लग्नापुर्वी मला किमान पंधरवड्यापर्यंत वेगळे राहावे लागेल. अशा स्थितीत लग्न करण्यापेक्षा कोरोना रूग्णांची सेवा करणे योग्य असल्याचं ईटीव्ही भारत प्रतिनिधीशी बोलताना रुचिका म्हणाल्या.
3 ते 4 लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह करता येईल, असे सांगण्याचा प्रयत्न माझ्या कुटुंबीयांनी सुरवातील केला. मात्र, आता माझे कुटुंबीयांनी ही कोरोना संकटानंतर लग्न करण्याच्या निर्णयाला सहमती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. रुचिकाची बहीण डॉक्टर असून ती चंदीगडच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये कार्य करत आहे.