नवी दिल्ली - हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रत्येक वर्गाला लक्षात ठेऊन केला असून मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठी-मोठी वचने दिली आहेत.
हरियाणामध्ये काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध, महिलांना नोकरीत 33 टक्के आरक्षण
हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे.
आमच्या पक्षाने सर्व वर्गाला लक्षात ठेऊन जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही काम करण्यामध्ये हिरो असून प्रसिद्धी करण्यामध्ये शुन्य आहोत. मात्र भाजप काम करण्यामध्ये शुन्य असून प्रसिद्धी करण्यामध्ये हिरो आहे. आमचे काम माध्यमांमध्ये नाही. मात्र जमिनीवर नक्की दिसते, असा टोला काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपला लगावला आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुख्य बाबी-
महिलांना रोजगारासाठी 33 टक्के आरक्षण, प्रत्येक कुंटुंबामध्ये योग्यतेनुसार नोकरी, शेतकऱ्यासह गरिबांची कर्जमाफी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार, दलितांना शिष्यवृती, विद्यार्थ्यांना पहिलीपासून दहावीपर्यंत १२ हजार रुपये शिष्यवृती अशी अनेक वचन जाहिरनाम्यामध्ये काँग्रेसन दिली आहेत.