महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्थलांतरीत कामगारांना माघारी आणण्यासाठी छत्तीसगड राज्याची हालचाल

स्थलांतरीत कामगार माघारी आणल्यानंतर त्यांच्या तपासणीची आणि विलगीकरणाची व्यवस्था करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आर. पी. मंडल यांनी जिल्हाधीकाऱ्यांना दिले आहेत.

By

Published : May 1, 2020, 3:22 PM IST

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

रायपूर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशभरामध्ये लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये स्थलांतरीत कामगार, मजूर, पर्यटक अडकून पडले आहेत. छत्तीसगड राज्याने स्थलांतरीत कामगारांना माघारी आणण्यासाठी योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विविध राज्यामध्ये अडकलेल्या कामगारांना आढावा घेण्यात येत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार एक लााख मजूर २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यापासून अडकून पडले आहेत. स्थलांतरीत कामगार माघारी आणल्यानंतर त्यांच्या तपासणीची आणि विलगीकरणाची व्यवस्था करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आर. पी. मंडल यांनी जिल्हाधीकाऱ्यांना दिले आहेत. परराज्यातून माघारी येणारे नागरिकांची माहीत जमा करण्याबाबतही मंडल यांनी सांगितले.

याप्रकरणी राज्यातील संबधीत जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांची माहिती तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी, यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा असे ते म्हणाले.

शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक स्थळे, आश्रमाचे रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण १ लाख ८ हजार ३१५ स्थलांतरीत कामगारांपैकी जम्मू काश्मीरात २५ हजार २०७, महाराष्ट्रात २० हजार १७६, उत्तरप्रदेश १३ हजार ८३७, तेलंगाणा १५ हजार ९४, गुजरात ९ हजार ५८४ आणि कर्नाटकात ३ हजार ४५९ मजूर अडकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details