नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतापुढे आरोग्य आणिबाणी निर्माण झाली आहे. रुग्णांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणे आणि इतर वैद्यकीय साधनांची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे आरोग्य संकट हाताळताना सुरक्षेशी संबधीत वस्तू आयात करताना करातून सुटका देण्यात आली आहे. या वस्तू आयात करताना सीमा शुल्क(कस्टम ड्युटी) आकारले जाणार नाही.
व्हेंटिलेटर, मास्क, सुरक्षा उपकरणे आयात करताना सीमा शुल्क रद्द, केंद्र सरकारचा निर्णय
बेसिक कस्टम ड्युटी आणि हेल्थ कर 30 सप्टेंबरपर्यंत आकारला जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. व्हेंटिलेटर, फेस मास्क, सर्जिकल मास्क, सुरक्षा उपकरणे, कोव्हीड टेस्ट कीट या गोष्टी आयात करताना करातून सुट देण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
बेसिक कस्टम ड्युटी आणि हेल्थ कर 30 सप्टेंबरपर्यंत आकारला जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. व्हेंटीलेटर, फेस मास्क, सर्जिकल मास्क, सुरक्षा उपकरणे, कोव्हीड टेस्ट कीट या गोष्टी आयात करताना करातून सुट देण्यात आली आहे. कमी किमतीत आणि तत्काळ या वस्तू भारताला उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाची तत्काळ अमंलबजावणी करण्यात येणार आहे, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.