नवी दिल्ली - सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील रखडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १ ते १५ जूलै दरम्यान होणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे. यातील होम सायन्स शाखेच्या परीक्षा १ जूलैपासून सुरू होणार असून सकाळी १०.३० ते दुपारी १.०० यादरम्यान पेपर होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सॅनियटायझर बाळगण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या तारखा जाहीर; बारावीच्या परीक्षा जूलैपासून
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील रखडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १ ते १५ जूलै दरम्यान होणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे.
यंदा राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांसोबतच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा देखील लांबणीवर पडल्या. वर्षांच्या अखेरच्या सत्रातील परीक्षांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला. दरवर्षी मार्च ते मे महिन्यांत वार्षिक परीक्षा पार पडतात.मात्र, यंदा महामारीने सगळ्याच परीक्षा बागरळल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यादाचे गुण देऊन पास करण्यात येणार आहे. मात्र अद्याप देशभरात अनेक परीक्षांचे भवितव्य अधांतरीच आहे. आता सीबीएसई बोर्डाने परीक्षांचे वेळापत्रक दिल्याने अन्य परीक्षांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.