महाराष्ट्र

maharashtra

कर्नाटकात कारचा भीषण अपघात, ४ जागीच ठार

By

Published : Aug 24, 2019, 10:35 AM IST

Updated : Aug 24, 2019, 10:45 AM IST

कर्नाटकातील 'बंगळुरू रुरल जिल्ह्यात' देवनहळ्ळी गावाजवळ कार पलटून अपघात झाला.

अपघात

बंगळुरू - कर्नाटकातील 'बंगळुरू रुरल जिल्ह्यात' देवनहळ्ळी गावाजवळ कार पलटून अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत झालेले व्यक्ती चिकबल्लापूर जिल्ह्यातील आहेत.

कार पलटून अपघात

मल्लीकार्जुन रेड्डी, नागार्जुन, अशोक रेड्डी, सुंदर अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण बेगपल्ली तालुक्यातील नक्कलपल्ली गावातील आहेत. जखमींना होसाकोटे आणि बंगळुरुमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चन्नरायापट्टना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Aug 24, 2019, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details