नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज(शुक्रवारी) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच कोरोनावरून देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भांडवली बाजारही कोसळला आहे. अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत सापडली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाचे आत्तापर्यंत देशात ७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.