महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीमा ओलांडून भारतात येणारी पाकिस्तानी ड्रोन पाडण्याची लष्कराला परवानगी

सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) १ हजार फूट किवा त्यापेक्षा कमी उंचीवरुन उडणारे ड्रोन पाडण्याची परवानगी मिळाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Oct 13, 2019, 9:21 PM IST

नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांपुढील डोकेदुखी वाढली होती. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात येणाऱ्या या मानवरहीत ड्रोनला खाली पाडण्याची परवानगी भारतीय सुरक्षा दलांना मिळाली आहे.

सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) १ हजार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीवरुन उडणारे ड्रोन पाडण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, आकाशात उडणारी वस्तू नक्की ड्रोनच आहे की, विमान याची संबधीत विभागाकडून खात्री केल्यानंतरच त्याला खाली पाडण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफला मानवरहित ड्रोन उडताना आढळून आली आहेत. चीनी बनावटीच्या या ड्रोनद्वारे बंदुका आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी दहशतवादी वापर करत आहेत. पंजाब राज्यामध्ये, अशी ड्रोन आढळून आली आहेत. ही मानवरहीत ड्रोन भारतामध्ये पाठवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर दहशतवादी गटांना मदत करत आहे.

पंजाबमधील फिरोजपूर येथील हुसेनवाला लष्करी छावणीजवळ सोमवारी रात्रीच्या वेळी एक ड्रोन सीमा पार करुन भारतामध्ये आले. त्यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. काश्मीर प्रश्नावरुन भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या या कुरापती सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details