नवी दिल्ली -भारत आणि चीनमध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये चीनविरोधात संताप व्यक् करण्यात आला. परिणामी ‘चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला’ अशी मोहिमही सुरू झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (मंगळवारी) आपल्या ट्वीटर खात्यावरून मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकार यांच्यामधील फरक स्पष्ट केला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेवर टीका केली.
गांधी म्हणाले, मोदी सरकारने भारतामध्ये ‘मेक इन इंडिया' ही योजना राबवली. मात्र, प्रत्यक्षात चीनकडून सर्वात जास्त वस्तू आयात केल्या आहेत. त्यांनी एका आलेखाचा संदर्भ देत एनडीए आणि युपीए सरकारच्या काळातील चीनी वस्तू आयातीचा फरक स्पष्ट केला आहे. 2014 नंतर मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चीनकडून जास्तीत जास्त वस्तू आयात करण्याचा सपाटाच लावला, असेही गांधी म्हणाले.