महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकात सत्ता स्थापनेचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेणार - जगदीश शेट्टार

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेणार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते जगदीश शेट्टार यांनी सांगितले.

By

Published : Jul 25, 2019, 3:00 PM IST

जगदीश शेट्टार

नवी दिल्ली - विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजप आता कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी आतुर झाली आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी कर्नाटक भाजपचे वरिष्ठ नेत दिल्लीमध्ये गेले आहेत. या शिष्ठमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांची भेट घेतली.

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेणार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते जगदीश शेट्टार यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही अमित शाह आणि जे. पी नड्डा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भात आमची चर्चा झाली. मात्र. याबबत आज दुपारी ३ वाजता पुन्हा चर्चा होणार आहे. त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळामध्ये सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे शेट्टार म्हणाले.

जगदीश शेट्टार, बसवराज बोमानी, अरविंद लिंबावली आणि जे. सी मधुस्वामी यांचे शिष्ठमंडळ दिल्लीमध्ये चर्चेसाठी गेले आहे. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएस सरकार आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात येऊन कोसळले. अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आता भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details