महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा भाजपने गैरफायदा घेतला; त्यामुळे उद्धव या पवित्र्यात'

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी भाजपला स्थान दिले. अडवाणी आणि वाजपेयी हे बाळासाहेबांच्या घरी गेले होते, आणि त्यांना भाजपसाठी जागा मागितल्या होत्या. भाजप सध्या त्याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपला धडा शिकवण्याच्या पवित्र्यात आहेत, असे वक्तव्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष, आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

By

Published : Nov 11, 2019, 4:28 PM IST

HD Deve Gowda about Uddhav Thackeray

बंगळुरू - महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास, पुढील पाच वर्षे त्यांनी स्थिर सरकार ठेवावे. तसे केल्यास लोकांचा काँग्रेसवरील विश्वास वाढेल. असे वक्तव्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष, आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी भाजपला स्थान दिले. अडवाणी आणि वाजपेयी हे बाळासाहेबांच्या घरी गेले होते, आणि त्यांना भाजपसाठी जागा मागितल्या होत्या. भाजप सध्या त्याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपला धडा शिकवण्याच्या पवित्र्यात आहेत. आता भाजपला नामोहरम करणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे, असेही देवेगौडा म्हणाले. महाराष्ट्रात सध्या चाललेल्या सत्तेच्या रणधुमाळीमध्ये त्यांचे हे वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details