लोकसभा रणकंदन: बिहारमध्ये भाजप-जेडीयूमध्ये 'समान जागावाटप'
लोक जनशक्ति पक्ष (एलजेपी) युतीमध्ये असून ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी रालोआमध्ये जाण्यास सहमती दिली होती. नवादा, खगडिया, वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर आणि जमुई येथून एलजेपी लढणार आहे.
भाजप-जेडीयू
नवी दिल्ली/पटना - लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि जेडीयू (जनता दल यूनायटेड) यांच्यात बिहारमध्ये 'समान जागावाटप' झाले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते वशिष्ठ नारायण झा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १७-१७ जागांवर निवडणूक लढवण्याशी सहमत झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप पटना, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सासाराम, अररिया, औरंगाबाद, सारण, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, शिवहर, उजियारपुर, दरभंगा, बेगूसराय, मधुबनी, महराजगंज या जागांवर निवडणूक लढवणार आहे.
जेडीयू सीतामढी, झंझारपूर, वाल्मिकी नगर, पूर्णिया, मधेपुरा, किशनगंज, कटिहार, कराकट, सुपौल, गोपालगंज, बांका, भागलपूर, गया, नालंदा, जहानाबाद, सिवान, मुंगेर या जागांवर लढणार आहे.
याशिवाय लोक जनशक्ति पक्ष (एलजेपी) युतीमध्ये असून ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी रालोआमध्ये जाण्यास सहमती दिली होती. नवादा, खगडिया, वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर आणि जमुई येथून एलजेपी लढणार आहे.
याआधी ऑक्टोबर, २०१८ मध्ये बिहार रालोआमध्ये जागावाटपाचे गणित ठरले होते. भाजप आणि जेडीयू यांनी १७-१७ जागांवर निवडणूक लढण्यास सहमती दिली होती. २०१४ मध्ये बाजपने २२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी समान भागीदारी केली आहे.