पाटणा - बिहारमधील विविध भागात वीज कोसळून आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाले आहेत. गुरुवारी जोरदार पावसानंतंर राज्यात ठिकठिकाणी वीज कोसळल्यामुळे १०५ लोकांना जीव गमवावा लागला. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वीज कोसळल्याच्या घटनेमुळे अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
बिहारमध्ये वीज कोसळून मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून १०५ वर, मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून मृत्यूंमुळे मी व्यथित झालो आहे. दोन्ही राज्यात तातडीने बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया शह यांनी टि्वट करत दिली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून मृत्यूंमुळे मी व्यथित झालो आहे. दोन्ही राज्यात तातडीने बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया शहा यांनी टि्वट करत दिली आहे.
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. खगरिया आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १, जेहानाबाद, पश्चिम चंपारण, जमुई, सौपल, कैमूर आणि बक्सर या जिल्ह्यात प्रत्येकी २ बळी गेले आहेत. तसेच सरण, शिवहर, समस्तीपूर, मधेपुरा आणि सीतामढी या ठिकाणी प्रत्येकी एका जणाचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन कामात व्यस्त असणाऱ्या लोकांचाच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.