महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नितिश कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सीताराम सिंह हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता

बिहार मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे

नितिश कुमार
नितिश कुमार

By

Published : Jan 6, 2020, 5:56 PM IST

नवी दिल्ली - बिहार मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीताराम सिंह हत्या प्रकरणी पाटणा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत नितीश कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे.


पंडारक येथील ढीबर गावामध्ये 16 नोव्हेंबर 1991 ला सीताराम सिंग यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणी नितिश कुमार यांच्यासह इतर 5 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पाटणा न्यायालयाने नितिश कुमार आणि इतर 2 जणांना आरोपमुक्त करण्यात आले होते. त्यावर पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details