मुंबई -केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांची संख्या पाहता आज साधारणपणे 25 कोटी कामगार संपावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- LIVE update
- 2:58 PM नाशिक-
- 230 PM ठाणे- वाहतूक सुरळीत सुरू, बंदचा परिणाम नाही.
- 2:15 PM परभणी- रास्ता रोको आंदोलन
- 2:12 PM अहमदनगर - विविध संघटना रस्त्यावर
- 2:10 PM मुंबई - एटीएम सेवा बंद
- 2:02 PM सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
- 1:15 PM रत्नागिरी-येथील सरकारी कर्मचारी भारत बंदला समर्थन देत रस्त्यावर उतरले आहेत. पोस्टल कर्मचारी ग्रुप - सी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणा देत आंदोलन केले.
- 1:10 PM रायगड -जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
- 1: 05 PM पवई -भारत बंदला समर्थन देत पूर्व उपनगरात पवई येथे डाव्या संघटनेमार्फत निदर्शने करण्यात येत आहे.
- 12:10 PM ठाणे- जिल्ह्यातील मुरबाड येथील महाराष्ट्र इंजिनियरींग उद्योग कामगार संघटनेच्या कामगारांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी मोदी सरकार चले जावच्या घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात केली. शहापूरमधील मुंबई-नाशिक महामार्गावर दुपारच्या सुमारास रस्ता रोको करणार असल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.
- 12:07 PM मुंबई-आझाद मैदानावर भारतीय कामगार सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. मुंबई कोटक महिंद्रा बँक, इंडस बँक या खासगी बँकेतील कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.
- 12:05 PMपुणे- शहरात बंदचा कुठलाही परिणाम दुपारी बारापर्यंत तरी जाणवला नाही. पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील दुकाने नेहमीप्रमाणे सुरू आहेत. तसेच शहरातील अन्य सर्व दुकाने, रिक्षा, पीएमपी ही वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय देखील नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
- 11: 50 AM कोल्हापूर-बंदला पाठिंबा दर्शवत कर्मचारी मोठ्या संख्येने टाऊन हॉलमध्ये एकत्र झाले आहेत. थोड्याच वेळात सहभागी झालेल्या सर्व कामगार संघटनांच्या मोर्चाला सुरुवात होणार असून बिंदू चौकात मोर्चाची सांगता होणार आहे.
-
11:45 AM औरंगाबाद - येथील विविध संघटना संपात सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, घाटी रुग्णालयातील परिचारिका देखील या संपात सहभागी होणार असल्याने घाटी रुग्णालयातील काही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.
- 11:30 AM मुंबई -दादरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत बंदचा काही परिणाम दिसून आला नाही. जनजीवन सुरळीत सुरू आहे. दादरमध्ये दुपारनंतर निदर्शने सुरू होणार आहेत, अशी महिती मिळत आहे. या निदर्शनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- 10:57AM मुंबई -भारत बंदमध्ये शिवसेनेने सुद्धा आपला सहभाग नोंदवला आहे. मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, बंदचा जनजीवनावर काही विशेष परिणाम दिसून येत नाही. मुंबईतील रेल्वे वाहतूक, बेस्ट बस सेवा व इतर वाहतुकीची साधनेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
- 10:30 कोल्हापूर-शहरात बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. शाळा, महाविद्यालये सुरळीत चालू आहेत. शहरातील बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत.
- 10;00 AM मुंबई -सकाळी 9 वाजेपर्यंत बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. रस्ते वाहतूक, लोकल सेवा, चाकरमान्यांची रेलचेल रस्त्यावर दिसून येत आहे.
- 9:10 AM अमरावती-भारत बंदमध्ये सहभाग नोंदवत येथील सायन्य चौकातील मैदानातून दुपारी एक वाजता मार्चा काढण्यात येणार आहे. सकाळपर्यंत बंदचे पडसात शहरात दिसून आले नाहीत. मात्र, दुपारनंतर पडसाद दिसण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण..
2 जानेवारी 2020ला कामगार मंत्रालयाने बैठक बोलावली होती. यामध्ये कामगार संघटनांना ज्या गोष्टींचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामधील एकही गोष्ट सरकारने मान्य केली नाही. सरकारचे एकूण धोरण हे कामगार विरोधी आणि जनतेविरोधी आहे. त्यामुळे, हा बंद पुकारला असल्याचे या कामगार संघटनांनी आपल्या पत्रकामधून स्पष्ट केले आहे.
सर्वच सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे सुरू आहे. देशातील 12 विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले असून, एअर इंडियाही विकण्याच्या तयारीत सरकार आहे. तसेच, बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील कर्मचाऱ्यांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले. रेल्वे आणि युद्धसामग्री बनवणारे कारखानेही हळूहळू खासगीकरणाच्या दिशेने जात आहेत. या सर्व गोष्टींचा विरोध या कामगार संघटना करत आहेत.
कोणकोणत्या संघटना सहभागी?