चमोली (उत्तराखंड) - बद्रीनाथ महामार्गावर एक प्रवासी बस दरीत कोसळून अपघात झाला. यात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस ऋषिकेशकडून बद्रीनाथकडे जात होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना दरीतून बाहेर काढले आणि जवळील रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या ३ प्रवाशांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. या अपघातात औरंगाबादचा एक प्रवासी जखमी झाला आहे.
बद्रीनाथ येथे बस कोसळून २५ जण जखमी; जखमींमध्ये औरंगाबादचा एक प्रवासी
बद्रीनाथ महामार्गावर एक प्रवासी बस दरीत कोसळून अपघात झाला. यात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस ऋषिकेशकडून बद्रीनाथकडे जात होती. या अपघातात औरंगाबादचा एक प्रवासी जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रवाशांनी भरलेली एक बस (यूके 07 पीए 3477) ऋषिकेश येथून बद्रीनाथकडे जात होती. यावेळी बद्रीनाथ महामार्गावर कर्णप्रयागच्या कालेश्वर मंदिराजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पुलावरून खाली जात दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच कर्णप्रयाग आणि लंगासू येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. जखमी प्रवाशांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३ गंभीर जखमी प्रवाशांना उपाचारासाठी श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकुण २८ प्रवासी होते. यापैकी २५ प्रवासी जखमी झाले आहेत. हे प्रवासी हरियाणा, पंजाब, गुजरात, औरंगाबाद(महाराष्ट्र) आणि वाराणसी येथील आहेत. प्राथमिक माहितीनुसार वळण घेताना हा अपघात झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.