लखनऊ - मशिदीत शुक्रवारची विशेष नमाज अदा करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी सुरू आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथे काही मुस्लीम बांधव शुक्रावारची नमाज अदा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचली. पण, तेथील काहींनी पोलिसांवरच दगडफेक केली.
उत्तर प्रदेश : नमाजाची चौकशी करण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
कन्नोज येथील कागजियाना भागात एका मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यात येत असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक राजवीर सिंह यांना मिळाली होती. त्यानंतर ते आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील काही लोकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरूवात केली.
कारवाईसाठी आलेली पोलीस
कन्नोज येथील कागजियाना भागात एका मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यात येत असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक राजवीर सिंह यांना मिळाली होती. त्यानंतर ते आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील काही लोकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात पोलीस निरीक्षक राजवीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा -शुक्रवारची नमाज घरातूनच अदा करा; जमैत उलेमा-ए-हिंद संघटनेचे आवाहन..