महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचे असंवेदनशील वक्तव्य, "बालकांचा मृत्यू होणं हे काही नवं नाही"

राज्यातील कोटा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी 77 बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी  असंवेदनशील वक्तव्य केले आहे.

गहलोत
गहलोत

By

Published : Dec 29, 2019, 9:53 PM IST

जयपूर - राज्यातील कोटा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी 77 बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी असंवेदनशील वक्तव्य केले आहे. राज्य व देशातील प्रत्येक रुग्णालयात दररोज बालकांचा मृत्यू होतो. यात नवं काही नाही, असे गहलोत म्हणाले.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचे असंवेदनशील वक्तव्य


राज्याता प्रत्येक वर्षी जवळपास 1 हजार 500 मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण होते. मात्र या वर्षी हे प्रमाण फक्त 900 आहे. देशातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 4 ते 5 मुलांचा मृत्यू होतो. त्यात नवे काय आहे. कोटामधील बालकांच्या मृत्यू प्रकरणी मी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. आमच्या सरकारच्या काळात ऑपरेशन थिएटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बालकांचा मृत्यू दर घटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे गहलोत म्हणाले.

हेही वाचा -बसप आमदाराला सीएएचं समर्थन करणं पडलं महागात, मायावतींनी केलं निलंबित

राज्यातील कोटा जिल्ह्यामध्ये जे. के. लोन रुग्णालयात 1 महिन्यापूर्वी तब्बल 77 बालकांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 10 मुलांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये भरती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details