दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता तपासणीसाठी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शाहा आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती खालावली; 'एम्स'मध्ये दाखल
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
माजी वित्तमंत्री अरूण जेटली यांना तपासणीसाठी दिल्लीतीत एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जेटली यांची प्रकृती खालावली होती. सद्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारा वेळीही अरुण जेटली यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्यासंबंधी पत्र लिहिले होते.
Last Updated : Aug 9, 2019, 8:57 PM IST