महाराष्ट्र

maharashtra

गोव्यात नरकचतुर्दशीला नरकासुराचे दहन, कारागिर कागदी मुखवटे बनवण्यात व्यस्त

कागदी लगद्यापासून नरकासूर प्रतिमा गोव्याच्या काही ठराविक भागात बनविल्या जातात. हे तयार करणारेही पारंपरिक पद्धतीने शिकून बनवत असतात. केवळ मागणीनूसार असे मुखवटे तयार केले जातात. कागदी रद्दी आणि रंग यांच्या किमती वाढल्या आहेत. याचाही यावर परिणाम जाणवतो.

By

Published : Oct 22, 2019, 10:36 AM IST

Published : Oct 22, 2019, 10:36 AM IST

गोव्यात नरकचतुर्दशीला नरकासुराचे दहन

पणजी - गोव्यात नरकचतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नरकासूर प्रतिमा दहन केली जाते. गवत, कागद आणि कापड यापासून अशा प्रतिमा बनवून त्यांना मुखवटे लावून सजवले जाते. त्यासाठी नरकासुराचे कागदी मुखवटे तयार करण्यात कारागिर व्यस्त झाले आहेत.

गोव्यात नरकचतुर्दशीला नरकासुराचे दहन

कागद, खळ आणि पाण्याचे रंग वापरून कलाकार, असे मुखवटे बनवत असतात. एक मुखवटा तयार करण्यासाठी आकारानुसार किमान दीड ते अडीच दिवस लागतात. कागदाचा लगदा तयार करून वेगवेगळ्या आकारातील मुखवटे तयार केले जातात. ते वाळल्यानंतर आकर्षक स्वरुपात विविध रंगाने रंगवले जातात. प्रत्येक मुखवटा तयार करण्यासाठी करागिर आपली कल्पनाशक्ती वापरून हे बनवत असतात.
गोवा नरकासुराच्या हलणाऱ्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नरकासूर आक्राळविक्राळ बनविले जातात. काही ठिकाणी नरकासूर प्रतिमा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे मंडळे मागील पंधरवड्यापासून अशा प्रतिमा तयार करताना दिसत आहेत.

कागदी लगद्यापासून नरकासूर प्रतिमा गोव्याच्या काही ठराविक भागात बनविल्या जातात. हे तयार करणारेही पारंपरिक पद्धतीने शिकून बनवत असतात. केवळ मागणीनुसार असे मुखवटे तयार केले जातात. कागदी रद्दी आणि रंग यांच्या किंमती वाढल्या आहेत. याचाही यावर परिणाम जाणवतो.

उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील नानोडा गावी असे मुखवटे तयार करणारे प्रज्योत गोवेकर म्हणाले, वडिलांकडून ही कला आत्मसात केली आहे. पूर्वी ते अशाप्रकारचे मुखवटे बनवायचे. आता मार्गदर्शन करत असतात. गिऱ्हाईकांना परवडतील आणि मागणीनुसार आम्ही नरकासूर मुखवटे तयार करतो. आमच्याकडे 350 रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत किंमतीचे मुखवटे आहेत. कागदाची रद्दी, खळ आणि पाण्याचे रंग आम्ही हे बनविण्यासाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details