पुणे- देशाच्या सुरक्षिततेला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष असे धोके आहेत. हे धोके लक्षात घेऊन आपल्या सैन्याने सज्ज राहावे, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरीया यांनी केले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उच्च पातळीवरील ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग तसेच सर्व स्तरांवर नेतृत्व आवश्यक असल्याचेही भदौरीया यांनी सांगितले. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 139व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात बोलत होते.
देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होणाऱ्या नवीन परीक्षणार्थिंना उद्देशून भदौरीया म्हणाले की, तुमच्याकडे उत्तम ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. सैन्यात तुम्ही नवीन असल्याने देशातील भौगोलिक परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जगभरातील राजकीय वातावरणाचा आपल्या देशाच्या सुरक्षेवर आणि वातावरणावर परिणाम होतो, याबद्दल तुम्ही जागरुक असणे अपेक्षित आहे, असेही भदौरीया म्हणाले.
एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी -