- कर्नाटकमध्ये 35 मुस्लीम संघटना एकत्र येऊन सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रदर्शन करणार आहेत.
- उत्तर प्रदेशमध्ये हिंसा पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तब्बल 875 लोकांना अटक केली आहे.
- अहमदाबादमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यासह इतर 64 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
- बिहार बंदमध्ये पटणासह इतर शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये हिंसा केल्याच्या आरोपावरून पटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी यादव, आरजेडी प्रदेश अध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यासह इतर नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ अलिगड मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार झाला होता. त्यानंतर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आज जिल्हा प्रशासनाने परिस्थीती पुर्वपदावर येत असल्याचे पाहूण इंटरनेट सेवा सुरू केली आहे. तसेच वाराणसीत दोन दिवसानंतर पुन्हा इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींची आजची रॅली ही आभार रॅली नसून धोका रॅली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
- नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी संबोधीत केले. पोलिसांनी विद्यार्थांना केलेला लाठीमार हा लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले.
- उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलनात ठार झालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले.
- केरळमध्ये दोन्ही विरोधी पक्ष आहेत, तेथे सीएएला विरोध करणे हास्यास्पद आहे - केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे.
- मुस्लीम नागरिकांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात समाविष्ट करण्याची मागणी शिरोमणी अकाली दलाने केली आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये सीएए विरोधातील प्रदर्शनामध्ये 15 लोकांचा मृत्यू तर 4 हजार 500 जणांना अटक करण्यात आली आहे.
1.17 PM :या मुद्यावरून केरळमध्ये विरोधी पक्षच नाहीये, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही सीएए विरोधात आंदोलन करत आहेत हे दुर्दैवी आहे - व्ही. मुरलीधरन (केंद्रीय राज्यमंत्री, परराष्ट्र मंत्रालय)
1.00 PM : कानपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था, १२ लोकांना अटक तर १५ लोकांना घेतले ताब्यात..
11.20 AM : सीएए विरोधी आंदोलनामध्ये जीव गमावलेल्या दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत - बी. एस. येदीयुरप्पा (मुख्यमंत्री, कर्नाटक राज्य)
11.00 AM : तृणमूल काँग्रेसचे काही नेते लखनौला येणार असल्याची माहिती मिळाली. मात्र इथे कलम १४४ लागू असल्याने, त्यांना तसे करण्याची परवानगी देता येणार नाही - ओ.पी. सिंह (पोलीस महासंचालक, उत्तर प्रदेश)