महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात, आरोग्य विभागातील ३ महिला कर्मचारी निलंबित

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दिव्यावानी समथा, जयालक्ष्मी अशी कामाच्या वेळेत व्हिडिओ शूट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात

By

Published : Jul 28, 2019, 11:47 AM IST

तेलंगणा- सध्या तरूणाईमध्ये टिक-टॉक अॅपचे मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, हे अॅप वापरणं आतापर्यंत अनेकांना महागात पडलं आहे. कामाच्या वेळेत टिक टॉकवर वेळ घालवताना दिसल्याने अनेकांचे निलंबन झाले आहे. आता हेच टिक टॉक अॅप तेलंगणातील आणखी एका निलंबन प्रकरणाचं कारण बनलं आहे.

टिक-टॉक व्हिडिओ पडला महागात

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दिव्यावानी समथा, जयालक्ष्मी अशी कामाच्या वेळेत व्हिडिओ शूट करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि नंतर हे प्रकरण निलंबनापर्यंत गेलं.

ABOUT THE AUTHOR

...view details