नवी दिल्ली - लोकसभेच्या कामकाजात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एमआयएम नेते असुदुद्दीन ओवैसी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान, अमित शाहांनी ओवैसींना खडसावताना म्हटले, की दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची सवय लावा.
लोकसभा : 'ऐकून घेण्याची सवय लावा'; अमित शाहांनी औवेसींना खडसावले
ओवैसी साहेब तुम्हीही ऐकून घेण्याची सवय लावून घ्या. अशाप्रकारे काही चालणार नाही, तुम्हाला ऐकावेच लागेल.
अमित शाह म्हणाले, राजासाहब बोलत असताना तुम्ही का उभे राहिले नाहीत. राजासाहब यांनी बोलताना अनेक गोष्टी नियमाविरुद्ध बोलल्या, तरीही आम्ही ऐकत राहिलो. ओवैसी साहेब तुम्हीही ऐकून घेण्याची सवय लावून घ्या. अशाप्रकारे काही चालणार नाही, तुम्हाला ऐकावेच लागेल. शाहांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी शाह भिती घालत असल्याचा आरोप केला. यावर शाह म्हणाले, यामध्ये भिण्याचे काहीही कारण नाही. लोकसभेत दोन्ही बाजूंनी सदस्य बोलत असताना तुम्हांला मुद्दा मांडायचा असेल तर, दोन्ही सदस्यांचे बोलणे झाल्यावर तुम्ही तुमचे मत व्यक्त करा. राजासाहब आणि सत्यपाल यांच्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे परिणाम आहेत. भिती घालण्याचा तर प्रश्नच येत नाही. भिती तुमच्या मनात असेल तर मी काही करू शकत नाही.