तिरूअनंतपूरम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीचे संकेत देत केरळमधील जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्य शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्च्युअल क्लासेसमध्ये हजेरी लावली. राज्याच्या सामान्य शिक्षण विभागांतर्गत व्हिक्टर्स वाहिनीद्वारे 'फर्स्ट बेल' या नावाने या शैक्षणीक सत्राचे प्रसारण होणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांसाठी ही ऑनलाईन सत्रे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत या वेळेत प्रसारीत होणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शैक्षणीक वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी संदेशाद्वारे सांगितले. ते म्हणाले की, शिक्षकांनी आणि पालकांनी मुले ऑनलाईन वर्गात हजर राहतील याची काळजी घ्यावी. साथीच्या या रोगामुळे आम्ही आपल्या दैनंदिन जीवनात काही निर्बंध आणले आहेत. यासाठी सामाजिक अंतर ठेवण्यची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणीक वर्गासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणे शाळा सुरू केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मात्र आपल्याला विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ठेवावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँन्ड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन (केआयटीई) ने वर्ग आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 वीचा वर्ग वगळता 1 ली ते 12 वीच्या सर्व वर्गांसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून राज्यातील 45 लाख विद्यार्थी आणि पालक याच्याशी जोडले जाणार आहेत. शैक्षणीक वर्गांना हा पर्याय नाही परंतू शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहकार्य करत असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री सी. रविंद्रनाथ यांनी सांगितले.
वेगवेगळ्या वर्गांसाठी अर्धा ते दोन तासांचे भाग केले असल्याचे केआयटीईने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. अभ्यासाची ही नविन पद्धत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आव्हान असल्याचे सार्वजनिक सुचना विभागाच्या के. जीवन बाबू यांनी सांगितले. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन वर्गांसाठीची व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांची विभागाला चिंता होती. आम्ही वर्ग शिक्षकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना ज्या विद्यार्थ्यांकडे दूरदर्शन, स्मार्टफोन, संगणक किंवा ऑनलाईन वर्गांसाठी इंटरनेट उपलब्ध आहे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपविली आहे. तशी व्यवस्था नसल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांसाठी उपस्थित राहण्यासाठीचा पर्याय शोधावा. असे बाबू म्हणाले.
यासाठी विभागाने विद्यार्थ्यांच्या शेजार्यांच्या दूरचित्रवाणी किंवा इंटरनेट सुविधा असलेले मित्र, ग्रंथालये किंवा अक्षय केंद्र यांचे पर्याय सुचविले आहेत. सर्व वर्गांचा अभ्यास हे डाउनलोड करण्यायोग्य स्वरुपात सून ज्या विद्यार्थांना या वर्गास उपस्थित राहता येवू शकले नाही, ते नंतर त्याद्वारे अभ्यास करू शकतात. व्हिक्टर्स वाहिनीवरील सर्व सत्रे किट व्हिक्टर्स वेबसाइट, मोबाइल अॅप आणि समाज माध्यमांवर एकाच वेळी उपलब्ध असेल. पहिल्या आठवड्यात या वर्गांचे चाचणी प्रसारण केली जाईल. तर दुसर्या आठवड्यात याची पुनरावृत्ती होईल, असे विभागाने म्हटले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), केआयटीई, समग्र शिक्षा केरळ (एसएसके) आणि राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था यासारख्या सामान्य शिक्षण विभागांतर्गत एजन्सीद्वारे वेगवेगळ्या वर्गांचे मॉड्यूल्स तयार केले जातील. पहिल्या आठवड्यात किमान 1 लाख 20 हजार लॅपटॉप, 7000 हून अधिक प्रोजेक्टर आणि जवळजवळ 4545 दूरदर्शन टीव्ही विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत.
तसेच केरळमधील विविध स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दलित वसाहती आणि आदिवासी वसाहतीत डिजिटल वर्ग कक्ष स्थापित केले आहेत.