नवी दिल्ली - चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हुबेई प्रांतात कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने तेथे अडकलेल्या ६४५ भारतीयांना हवाई मार्गाने माघारी आणण्यात आले होते. हे सर्व नागरिक सुखरुप असून कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना व्हायरस: चीनमधून भारतात परतलेले ६४५ जणही सुखरूप, कोरोना 'टेस्ट निगेटीव्ह'
भारतात दाखल झाल्यानंतर सर्वांची वैद्यकिय चाचणी घेण्यात आली होती. त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
हेही वाचा -कोरोना व्हायरस: चीनमध्ये मृतांचा आकडा ५६२ : भारतीय दुतावासाने जारी केले हॉटलाईन नंबर
भारतात दाखल झाल्यानंतर सर्वांची वैद्यकिय चाचणी घेण्यात आली होती. तसेच त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले होते. एअर इंडियाच्या विशेष विमानाने नागरिकांना हुबेई प्रांतातील वुहान येथून बाहेर काढण्यात आले होते. एअरलिफ्ट करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणू : ४२५ लोकांचा बळी, तर उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्याही वाढली..
चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत. अजूनही अनेक भारतीय हुबेई प्रांतात अडकून पडले आहेत.