महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्या निकाल: मुस्लिम पक्षकारांनी ऐनवेळी बदलली बैठकीची जागा

अयोध्या निकालाच्या विरोधात पुनर्याचिका दाखल करायची किंवा नाही याचा निर्णय आज (रविवारी) मुस्लिम पक्षकार घेणार आहेत. काल सर्व पक्षकारांशी केलेल्या चर्चेमध्ये याचिका दाखल करण्याबाबत एकमत झाले होते. त्यामुळे आज फक्त औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

बैठकीला जाताना

By

Published : Nov 17, 2019, 12:43 PM IST

Updated : Nov 17, 2019, 3:05 PM IST

लखनऊ - अयोध्या निकालाच्या विरोधात पुनर्याचिका दाखल करायची किंवा नाही याचा निर्णय आज (रविवारी) मुस्लिम पक्षकार घेणार आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्व सदस्य लखनऊमध्ये पोहचले आहेत. यावेळी मुस्लिम पक्षकारांना देऊ केलेल्या ५ एकर जमिनीबाबतही चर्चा होणार आहे. काल सर्व पक्षकारांशी केलेल्या चर्चेमध्ये याचिका दाखल करण्याबाबत एकमत झाले होते. त्यामुळे आज फक्त औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

बैठकीची माहिती देताना प्रवक्ते
ही बैठक लखनऊमधील नवदा कॉलेजमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी बैठकीची जागा बदलण्यात आली. बैठक मुमताज कॉलेजमध्ये सुरू आहे. मात्र, काही सदस्य बैठकीतून निघून जात असल्याचे समोर आले आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीतून निघून जाताना सदस्य
मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात अयोध्या निकालाविरोधात पुनर्याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय कालच्या भेटीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीआधीच मुस्लिम पक्षकारांचे वकील जफरयाब जिलानी आणि सदस्यांनी मुस्लिम पक्षकारांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्यही उपस्थित होते. मात्र, आजच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात आले तर काही मुस्लिम संघटनांनी आणि व्यक्तींनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत नाराजी व्यक्त केली.
Last Updated : Nov 17, 2019, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details