बंगळुरू - जी गोष्ट मागून मिळत नाही, ती गोष्ट आपल्याला हिसकाऊन घ्यावी लागणार आहे. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा! असे वक्तव्य एआयएमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी केले. ते कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलत होते.
पठाण म्हणाले, की आपल्या बोलण्याच्या विरोधात ते लढू शकत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आम्ही आता 'ईट का जवाब पत्थर से देना' शिकलो आहोत. मात्र आपल्या सर्वांना एकत्र यायला हवे. जी गोष्ट आपल्याला मागून मिळत नाही, ती आता हिसकाऊन घ्यावी लागणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागणार आहे. ते आपल्याला म्हणतात, की तुम्ही तुमच्या बायकांना पुढे केले आहे. मात्र, आपल्या केवळ वाघिणी बाहेर पडल्या आहेत तर त्यांना घाम फुटला आहे. विचार करा, आपण सर्व एकत्र येऊन बाहेर पडलो, तर काय होईल. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा!